किरण युवराज भदाणे
चालक पोलीस कॉन्स्टेबल/१६५१
सदरचे अंमलदार हे पश्चिम देवपुर पोस्टे येथे नेमणुकीस असुन सरकारी वाहन क्रे-०१ वर चालक म्हणून काम करतात. ते कर्तव्य बजवित असतांना अतिशय सतर्क असतात त्यांच्या सतर्कतेमुळे दि.१८/०१/२०२५ रोजी २:३० वाजेच्या सुमारास रात्रगस्त करीत असतांना इसम नामे शहजाद अली ऊर्फ भुऱ्या शौकत अली शेख यास संशयीत रित्या फिरत असतांना ताब्यात घेवून त्याच्याकडील मोटार सायकलबाबत विचारपुस केली असता ती चोरीची आढळून आल्याने पश्चिम देवपुर पोस्टे येथे चोरीचा गुन्हा दाखल केला. तसेच त्यांच्या सतर्कतेमुळे पोस्टे परिसरातील घर फोडी व चोरीच्या गुन्हयांना आळा बसलेला आहे. अशा प्रकारची उत्कृष्ठ कामगीरी केलेली आहे.