महिला सुरक्षा (सेफ्टी_फर्स्ट!! सुरक्षिततेचा मूलमंत्र)
- नियमितता टाळा (Don't be Predictable): रोज तीच वेळ, तोच रस्ता किंवा तीच पार्किंगची जागा वापरणे टाळा. कधीतरी मार्ग बदला जेणेकरून तुमचे वेळापत्रक कोणाला सहज कळणार नाही.
- माहिती शेअर करा: कुठे निघालात याची माहिती घरच्यांना आवर्जून द्या किंवा फोन/व्हॉट्सॲपवर लोकेशन शेअर करा.
- दुर्लक्ष टाळा: रस्त्यावरून चालताना किंवा सार्वजनिक ठिकाणी फोनवर अतिशय वैयक्तिक बोलणे किंवा कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे टाळा.
- राइड लोकेशन शेअरिंग: ओला/उबरने प्रवास करताना घरच्यांसोबत थेट लोकेशनचा रूट शेअर करा.
- मोफत लिफ्ट नाकारा: अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद वाहनातून लिफ्ट देणे स्वीकारू नका.
- सुरक्षा साधने सोबत ठेवा: प्रवासादरम्यान बॅगेत पेप्पर स्प्रे, अलार्म वॉच किंवा इलेक्ट्रिक टॉर्च यांसारखी स्वसंरक्षण साधने जवळ बाळगा. हे ऑनलाईन उपलब्ध असतात.
- आणीबाणीच्या प्रसंगी: कोणतीही अडचण आल्यास त्वरित ११२ वर कॉल करा. ५ ते १० मिनिटांत पोलीस तुमच्या मदतीला पोहोचतील.
सतर्क राहा - सुरक्षित राहा (Be Alert - Be Safe..!!)