आमचे ध्येय

भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्राकडे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक दल आहे. मोठी शहरी केंद्रे असलेल्या आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत महाराष्ट्राने आपल्या मोठ्या शहरांतील पोलीस व्यवस्थेसाठी आयुक्तालय पद्धती स्वीकारली आहे. राज्यात १० पोलीस आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य “सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय” आहे. याचा अर्थ महाराष्ट्र पोलीस सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचे नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी कटिबद्ध आहेत.