कर्तव्याला निष्ठेची साथ, सेवेला सन्मानाची पावती!
स्वातंत्र्यदिनानिमित्त धुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना जाहीर झालेल्या ‘उत्कृष्ट सेवा पदकाबद्दल’ हार्दिक अभिनंदन!
नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या समर्पित आणि उल्लेखनीय सेवेला मनःपूर्वक सलाम.
धुळे जिल्हा पोलीस दलातील एकूण 13 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक देण्यात आले.