ह्या वर्षे देखील धुळे मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे त्या निमित्ताने आज दि 12 रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती त्यामध्ये पोलीस अधीक्षक,जिल्हाधिकारी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, स्थानिक रहिवासी शाळा महाविद्यालय विद्यार्थी सामाजिक संस्था एनजीओ यांच्यातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत धुळे शहर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाचे फायदे धुळे शहर स्वच्छ व सुंदर होईल लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जबाबदारीची भावना निर्माण होईल पर्यावरण समस्या बाबत जागरूकता वाढेल त्यामुळे सर्व धुळेकरांना एकत्र आणून उपक्रम राबवण्यात आला. माझा जिल्हा धुळे माझा जिल्हा वृक्ष माझे बांधव ही शपथ घेऊन स्वच्छता मोहिमेचा समारोप करण्यात आला.