About Right to Service Act


"आपले सरकार"

राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता, तसेच लोकांच्या पोलीस प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीने महारष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश - २०१५. दि २७/०४/२०१५ रोजी लागू करण्यात आला आहे. सदरची अधिसूचना दि. १०.०७.२०१५ रोजी निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार शासनाने "आपले सरकार" या नावाने पोर्टल सुरु केले आहे. सदर पोर्टल मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दि. २६.०१.२०१६ रोजी लोकार्पित केले आहे. सदर अधिसूचनेनुसार या पोर्टलवर, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, ध्वनिपेक्षक परवाना, सभा-संमेलन-मिरवणूक यांना परवानगी देणे, शस्त्र परवान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, पारपत्र पडताळणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे इत्यादी एकूण ९ सेवा ऑनलाईन उपलब्ध केलेल्या आहेत. राज्यातील सर्व पोलीस ठाणे, सर्व संबधित पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त कार्यालये, सर्व पोलीस अधीक्षक / पोलीस उप आयुक्त कार्यालये, सर्व पोलीस आयुक्त व सर्व सह सचिव, गृहविभाग यांचेकडून पात्र नागरिकांना या सेवा ऑनलाईन पुरविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना या सेवांचा लाभ घेण्याची विनंती करण्यात येत आहे.

"आपले सरकार" पोर्टल : https://aaplesarkar.maharashtra.gov.in/


Information About Right to Service Act :- Click Here
Copyright © 2019 ® All Rights Reserved                Visit Counter : Developed By : Siddhi Software Solutions